उन्हाळा म्हंटले की मला आइसक्रीम आठवते,
आणि आइसक्रीम म्हंटले की तू..
लस्सी,बर्फाचा गोळा,आइसक्रीम ची नुसती बहार आणतो उन्हाळा,
पण,तुझ्याबरोबर आइसक्रीम खाण्याचा अनुभवच निराळा..
आइसक्रीम खातांना चेहराभर हसू फुललेले,
स्वाद घेतांना थोडेसे नाकालाही लागलेले..
समजते मजा, आयुष्यातल्या अनमोल क्षणांची,
किंमत मोजावी लागते फक्त आइसक्रीमची..
आइसक्रीम खाल्यानंतरची पाण्याची तहानही काही सांगते,
सर्व काही उपभोगूनही मन साध्या गोष्टीसाठी झुरते..
आइसक्रीमसारखेच आहे आयुष्य,आहे तो क्षण फक्त 'आपला',
कृतीहीन राहिलो तर क्षण हातात 'विरघळला'॥
No comments:
Post a Comment