आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, April 24, 2007

आयुष्य कोडं म्हणून पाहीलं
तर सोडवणं अवघड होवून बसतं
उत्तरांच्या असंख्य पारंब्या फुटून
एक भलं मोठं वडं होवून बसतं

सरळ साधं जगणं सोडून, आपण
मोह मायेच्या दूनियेत गुंतत जातो
प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता
उत्तरांनाचं प्रश्नात गुंफत जातो

सुर्याकिरणात चमकणारा दव
मोती बनून मिरवू लागतो
येताच वाऱ्याची एक झूळूक
शेवटी मातीतच हरवू लागतो

प्रत्येक गोष्टीचा अंत असतो
निसर्ग क्षणाक्षणाला शिकवतो
इवलासा दव पण जिवनातलं
सर्वात स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो

निसर्गाला आयुष्याचा गुरू मानून
कर्तव्याची दुर्वा वहायची असते
आयुष्याला निसर्गासारखं वाहू द्यावं
विणाकारण पर्वा करायची नसते


सुनील पांगे

No comments: