आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, January 17, 2008

मी पाहते

मी पाहते सुर्याला उगवताना
आणी एका आंधळ्या माणसाला सूर्या कड़े तोंड करुन
आपुल्या चेहर्‍यावर प्रकाश अनुभवताना

मी पाहते लोकाना ज्योतिषा कड़े हात दाखवताना
आणी हात नसले तरी ही पूर्ण पणे
यशस्वी झालेल्या माणसाला

मी पाहते लोकाना सारखी धावपळ करताना
आणी पाय नसलेल्या माणसाला हाताने गाड़ी सरकवत
पैसे मागताना

मी पाहते खिडकितुन पाउस पडताना
अणी समोर एका तुटक्या झोपडित मुलाना
आपले पदरात लपवून सांभाळणार्‍या आई ला

मी पहाते म्हातार्‍या जोडप्याला हात धरून चालताना
आणि त्यांच्या फ़ार मोठ्या झालेल्या मुलाला
त्यांना वृद्धाश्रमात सोडताना.

मी पहाते पार्टीत सांड लवंड करणार्‍या लोकांना
आणि बाहेर उष्ट्या ताटातून
अन्नचे दाणे वेचत फ़िरणार्‍या मुलांना

मी पहाते लोकांना दिवाळित खुप फ़टाके जाळताना
आणि दुसर्‍या दिवशी बारुदाच्या राखेतून
न जळालेले फ़टाके शोधत असणार्‍या मुलांना

मी पाहते कुत्र्याच्या पिल्लाला मोटारीत फ़िरताना
आणि कोपर्‍यात पडलेल्या कचर्‍याच्या पेटीत
एका तान्ह्या बाळाला रडताना

मी पहाते मुलांना थाटात शाळेत जाताना
आणि बाहेर बसलेल्या एका मुलाला
बुट पॉलिश करताना

मी पहाते लोकांना रॅलित नारे देताना
आणि काम न झाल्यावर
त्याच मंत्र्याना शिव्या देताना

मी पहाते आई बापाना थाटात मुलीचं लग्न करताना
आणि त्याच मुलीला
पैशापायी सासरी जळताना

-- लता

No comments: