आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, January 17, 2008

-मनातलं आभाळ-

खिडकीबाहेर उठून पाहिलं सकाळी
तर दाटून आले होते ढग;
जणु माझ्या मनातलंच आभाळ भरून आलय-
आसु ढाळतंय सारं जग.

जेंव्हा मलुल हवेचा
स्पर्श झाला ओलासा,
माझ्या खिन्न मनाला
मिळाला थोडा दिलासा.

जाऊन बसलो टेकडीवर,
मनातल्या आभाळाला वाट मोकळी करून दिली,
टपटपणार्या पावसात
माझी आसवंही मिसळून गेली.

तासाभरानी थांबला पाऊस,
मी मान वर करून पाहिलं;
-सोनेरी ऊन, प्रसन्न इन्द्रधनुष्य, हसणारं गवत...
माझ्या मनातलं आभाळ मात्र तसंच भरून राहिलं.

मग आला लक्षात माझा वेडेपणा-

माझ्यासारख्या क्षुल्लक माणसासाठी
काही विशेष घडत नसतं,
एकटाच असतो तो,
त्याच्याबरोबर जग रडत नसतं!

...मुकाट परतलो घरी,
पण मनाशी ठरवलं काही,
माझ्या मनातलं आभाळ मलाच दूर करावं लागेल
दुसरं कोणी येणार नाही!!

--केदार

No comments: