आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, August 09, 2007

भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय? - सुनील चिंचोलकर

श्रीमद् दासबोधामध्ये विसाव्या दशकात एक मौलिक ओवी येऊन जाते. समर्थ म्हणतात-

' सार्मथ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।।

या ओवीचा आजपर्यंत उपयोग कमी आणि दुरुपयोगच जास्त झाला आहे. याचे कारण या ओवीचे नेमके मर्म समजावून घेतले गेले नाही. वर्तमान युगात चळवळ हा शब्द अत्यंत लोकप्रिय झाला आहे. त्यात सार्मथ्य शब्द दादागिरी या अर्थाने वापरला जातो. याचा अर्थ चळवळीच्या नावाखाली माणसांनी वाटेल तो गोंधळ घालावा आणि त्याला भगवंताचे अधिष्ठान ठेवावे , असा अर्थ लोक लावतात. लोकांची भगवंताच्या अधिष्ठानाची कल्पनादेखील फार उथळ असते. देवाचा फोटो असला, देवाची पूजा केली म्हणजे भगवंताचे अधिष्ठान झाले. ही ओवी नीट समजावून न घेतल्यामुळे फार मोठा गोंधळ झाला आहे.

गणेशोत्सवाला गणपतीचे अधिष्ठान असते, याचा अर्थ गणेश मंडळाची सर्व चळवळ गणपतीच्या अधिष्ठानाखाली चालते. आता गणपतीपुढे अचकटविचकट चित्रपट गीते लावणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे किंवा रात्री दोन-दोन वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून नागरिकांना हैराण करणे या सर्व गोष्टी भगवंताच्या अधिष्ठानानेच होत असतात काय? मिर्झा राजे जयसिंग भगवान शंकराची पूजा केल्याखेरीज पाणीदेखील पीत नसे. शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यात यश यावे म्हणून त्याने एक यज्ञदेखील केला होता. याचा अर्थ मिर्झा राजांच्या चळवळीला भगवंताचे अधिष्ठान होते असे म्हणणार का? साताऱ्याचा अजिंक्यतारा प्रयत्न करूनही औरंगजेबाला मिळत नव्हता. १७०० साली त्या किल्ल्याजवळील खिंडीतल्या गणपतीला औरंगजेबाने गणेश याग केला. त्यानंतर त्याला किल्ला जिंकण्यात यश आले. या लढाईला भगवंताचे अधिष्ठान होते असे म्हणणार का? ज्या ब्रह्मावृंदाने हा गणेशयाग केला त्यांना तुम्ही पवित्र मानणार का? या सगळ्या प्रश्ानंची उत्तरे फार गंभीर आहेत. भगवंताचे अधिष्ठान हा शब्दप्रयोग एवढ्या सैल पद्धतीने वापरून चालणार नाही. त्यासाठी कर्माचा हेतू तपासावा लागेल. स्वामी विवेकानंद म्हणत असत- 'माणसे कर्माची फळं भोगत नाहीत तर त्या पाठीमागच्या हेतूंची फळे भोगतात.'

भगवंताचे अधिष्ठान ठरविताना कोणत्याही चळवळीचे हेतू तपासावे लागतील आणि परिणामांचे मूल्यमापन करावे लागेल. मिर्झा राजांची धामिर्कता दांभिक होती किंवा औरंगजेबाचा यज्ञ ही शुद्ध लबाडी होती. मिर्झा राजेंनी शिवाजी महाराजांच्या मुलुखातील अनेक गावे बेचिराख करून हजारो संसार उद्ध्वस्त केले. ज्या औरंगजेबाने शेकडो मंदिरे पाडली आणि हजारो मूतीर् फोडल्या, त्याला यज्ञ करण्याचा नैतिक अधिकार असूच शकत नाही. शिवछत्रपतींनी लढाईपूवीर् कुठे यज्ञ-याग केल्याची नोंद नाही. मात्र आपल्या सैनिकांना आज्ञा केली- 'तुम्ही रयतेस रंजीस आणू नका. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नका. तुम्हास जे साहित्य लागेल ते बाजारातून विकत आणा.' महाराजांना जो पराक्रम करायचा होता तो त्यांनी मैदानात लढणाऱ्या शत्रूसमोर केला. त्यांनी एकही मोहिमेत सामान्य प्रजाजनांना त्रास दिला नाही. उलट महाराजांचे सैन्य पाहताच कुणी घाबरून पळू लागले तर ते सैन्यच लोकांना प्रेमाने दिलासा देत होते. पुढे पुढे तर महाराजांचे सैन्य आहे हे कळले म्हणजे लोक रांंगोळ्या काढून स्वागत करू लागले. आदिलशाही आणि बादशाही मुलखातील नागरिक आपला प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून घ्यावा आणि स्वराज्याशी जोडावा म्हणून भगवंताला प्रार्थना करीत. महाराजांची चळवळ ही शुद्ध होती; कारण त्याला नैतिकतेचे अधिष्ठान होते. भगवंताचे अधिष्ठान म्हणजे नैतिकतेचे अधिष्ठान.

या ओवीतील पाहिजे हा शब्द असायला हवे (२ड्डठ्ठह्लद्गस्त्र) अशा अर्थाने नाही तर पाहिजे याचा अर्थ 'पाहायला शिका' असा होतो. ओवीचा अचूक अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल-'या जगात जिथे जिथे हालचाल दिसते तिथे तिथे सार्मथ्य आहे. आपल्याला हे सार्मथ्य हालचाल करणाऱ्या जीवाचे आहे असे वाटते. मात्र ते सार्मथ्य म्हणजे भगवंताची शक्ती आहे हे पाहायला शिका.' पंखा, फ्रीज, हीटर या सर्वांमध्ये सार्मथ्याची चळवळ आहे. पण वीज नसेल तर ही उपकरणं काम करू शकतील का? ज्याप्रमाणे ही सर्व उपकरणे विजेच्या अधिष्ठानावर काम करतात त्याप्रमाणे जीवाची सगळी कमेर् भगवंताच्या सत्तेवर चालू असतात. चळवळ म्हणजे हालचाल आणि अधिष्ठान म्हणजे सत्ता. तात्पर्य, ही ओवी पूर्ण आध्यात्मिक आहे. सामाजिक अथवा राजकीय चळवळीसाठी शुद्ध हेतूने तिचा वापर होणार असल्यास समर्थ त्या भक्ताला क्षमा करतील. मात्र स्वार्थासाठी कोणी ही ओवी वापरेल तर तो अक्षम्य अपराध ठरेल.

- सुनील चिंचोलकर

No comments: