स्वगत म्हणजे मनातल्या मनात.
विवाहाची आमंत्रणपत्रिका आल्यावर आपण हळूच "आहेर आणू नये" हे वाक्य बघतो व सर्वानी फुकटचे जेवण हादडायला जायचं असं एका सेकंदात मनात ठरवितो, तशागत.
ऎकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो.
पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पहाच.
बोलणारा(उघड):(आनंदाने)साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं. मुलगा झाला साहेब.
ऎकणारा(मनात):(मग एवढी वर्षे काय करत होतास?)
बोलणारा(उघड):साहेब ही माझी पत्नी सोनाली.
ऎकणारा(मनात):(मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?)
बोलणारा(उघड):साहेब मुलगा १०वीच्या बोर्डात ५वा आला.
ऎकणारा(मनात):(तो शेवटी का येईना मला काय करायचे?)
बोलणारा(उघड):विवाहाचं आमंत्रण द्यायला आलोय, सरोजशी लग्न ठरलंय.
ऎकणारा(मनात):(च्यायला, एवढे दिवस तर ती दिन्याबरोबर फिरत होती.)
बोलणारा(उघड):साहेब बढती मिळाली, उद्या पार्टी ठेवली आहे.
ऎकणारा(मनात):(एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)
बोलणारा(उघड):ही माझी बायको, पल्लवी
ऎकणारा(मनात):(ह्या माकडाला मस्त चिकनी बायको मिळाली. मजा आहे साल्याची.)
बोलणारा(उघड):हे फोटोंचे अल्बम पाहात बसा.
ऎकणारा(मनात):(आग लावा त्या अल्बम्सना, वैताग साला.)
बोलणारा(उघड):साहेब मला उद्या सुटी मिळेल का?
ऎकणारा(मनात):(अरे?उद्या तर मला तुझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जायचे होते.)
बोलणारा(उघड):साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता.
ऎकणारा(मनात):(कशी येणार?काल संध्याकाळी तर मी तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅण्ड पकडले होते.)
बोलणारा(उघड):साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमधे का आल्या होत्या?
ऎकणारा(मनात):(तुला कशाला पाहीजेत त्या नसत्या चांभारचौकशा?)
बोलणारा(उघड):साहेब देव्याच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.
ऎकणारा(मनात):(मग काय गावभर पेढे वाटू?)
बोलणारा(उघड):साहेब आज मी नवीन हिरो होंडा मोटर सायकल विकत घेतली
ऎकणारा(मनात):(बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)
बोलणारा(उघड):साहेब ५ वर्षे झाली, आता तरी माझं प्रमोशन करा की?
ऎकणारा(मनात):(लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे। ती तुला कशी देऊ?)
No comments:
Post a Comment