आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 30, 2007

अनवाणी चाललो तेव्हा

अनवाणी चाललो तेव्हा ,केला मी इतरांचा हेवा
मनात म्हटलं " साधी तरि चप्पल मला दे रे देवा"
....
पाय घातला चपलेत आणि वाटल आत जिंकलच जग
चप्पल मात्र जुनी पुराणी वाटु लागली लगेच मग
म्हटल "आतi नवीन हवी,सुन्दर आणि सुखदायी
तेवढं जर दिलंस देवा आणखी काही मागणार नाही"
...........
ते मिळलं मग वाटलं एक आता पुरत नाही
अजुन एक,अजुन एक हौस काही भागत नाही.
हे हवं ..ते ही हवं.. मिळवुन ना तर खेचुन घ्यावं
जगामधील सारं सुख माझ्या पायाखाली हवं
उरापोटी धावुन शेवटी, केलच सारं जमा भोवती
पर्वाच केली नाही जरी, तुटली सारी नाती-गोती
..........
सगळ्या सुखात आहे एकटा, निर्जीव भिंती, निर्जीव वाटा
ढिगभर चपलांमधे बुडुन गेलो आहे पुरता
...............
आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही
चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित...


(या कवितेत-चप्पल हे क्षुल्लक भौतिक गरजांचे प्रतिक॥)

-- पद्मश्री चित्रे

No comments: