आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 30, 2007

"तू होतीस तेव्हा"....

तू होतीस तेव्हा.....
तो चंद्रही चांदण्याचं लेणं लेऊन रोज रात्री सजत होता.
खिडकितून तुझं सौंदर्य चोरुन पाहण्यासाठी रात्र रात्र जागत होता.
पाऊसही तुझ्याच भेटिसाठी धरणीवर बरसत होता.
तुझ्या गालावर रेंगाळण्यासाठीच तो थेंब थेंब बनून तरसत होता.

तू गेलीस नि बघ, आपल्या नात्याच्या धरतीवर प्रेमाचा दुष्काळ पडलाय,
आता तर पाऊसही पडत नाही .
चंद्रही दडून बसला कुठे,
चांदण्यांच दर्शनही मला आता घडत नाही.

तू गेल्यापासून आसवांनीही माझी साथ सोडली.
सुख दुःखात समान साथ देणाऱ्या अश्रूंनीही साथ सोडावी
अशी सांग, माझ्याकडून गं काय चूक घडली।

तुझ्या साथीत थंडी नेहमीच गुलाबी वाटायची,
आता नुसताच बोचरा वारा असतो.
स्मृतीभ्रंश झाल्यापरी त्या गुलाबी आठवणींनाही
आता या शुष्क मनांत थारा नसतो.

तुझ्यासवे माझा प्रत्येक दिवस नवा होता.
तुझ्या प्रेमाचा नि सहवासाचा प्रत्येक क्षण मला पुनःपुन्हा हवा होता.

आता मात्र दिवसही वाटतो मला काळरात्र.
रोजंच ऊगवतो सूर्य माझ्यासाठी घेऊन न संपणारं हे काळोखाचं सत्र.
आता मात्र एकंच सांगणं आहे तुला.....
परत तू येऊ नको...
अर्ध्यावर सोडण्यासाठी माझा हात आता हाती तुझ्या घेऊ नको.

तुझ्याशिवाय आताशा जगायलाही मी शिकलोय.
हसू येत नाही ओठी पण,
मनावरचा घाव दाबून धरुन सर्वांसमोर खोटं खोटं हसायला मी शिकलोय.

येऊ नको परत, माझं नातं नव्यानं त्या आसवांशी जोडण्यासाठि.
शुष्क डोळ्यांनीच जगू दे आता ,
दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....
दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....

-- कुणाल.

No comments: