मी तुझ्याकडे पाहील्यावर
पहीली पायरी पार केली
मोजक्या क्षणांचं गाठोड बांधून
कवितांची डायरी तयार केली
मी तुझ्याकडे पाहील्यावर
पुढची पायरी पार केली
आभाळाला पंखात समावून
क्षितीजा पलीकडे घार केली
मी तुझ्याकडे पाहील्यावर
पुढची पायरी पार केली
स्वप्नांत तुझ्या स्मृती साठवून
वास्तवात चित्र हजार केली
रोज तुझ्याकडे पहायचो
एक नवी पायरी पार करायचो
मुकेपणीच पण, कितींदा
तुला एक एक क्षणी वरायचो
खरी पायरी पार करताना
मी हतबल, असमर्थ ठरलो
त्या उंची वरून घसरलो
जिथे फक्त व्यर्थ उरलो
आता पार करण्यासाठी
एकही पायरी उरली नाही
फाटक्या डायरीतील एकही ओळ
प्रत्येकक्षात उतरली नाही
ती रंगवलेली सारी चित्रं
तशीच कोरी राहून गेली
माझ्या निरागस डोळ्यातून ती
शेवटी बेरंगच वाहून गेली
आज त्या साऱ्या पायऱ्या
दाटून आल्या माझ्या गळ्याशी
तुझ्या डोळ्यात शेवटचं पाहीलं
मी पडलेलो अगदी तळाशी
@सनिल पांगे
No comments:
Post a Comment