आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, December 26, 2007

सुर न्हाईले आज मौनात माझ्या..
गीत गाईले आज मी मुक्याने....
हरवता कसा मी कुठे मी कळेना..
वाट दाविली मग मजला धुक्याने....

मनगटात माझ्या पुरा जोर होता..
अखंड पीळदार बळकट दोर होता....
अडकलो जीवनाच्या खोल गर्तेत जेव्हा..
मार्ग दाविला मग मला संकटाने....

रानीवनी कुठेही फिरलो मी कसाही..
माझी कुठेही पण थांबली वाट नाही....
खुल्या आसंमतात कधी गुदमरुन जाता..
खुणावले मग मला पिंजर्याने....

आडोशात होतो सदा सावलीच्या..
प्रासाद कधी तर कधी झोपडीच्या....
झळा लागता मला थंड गारव्याच्या..
दिली सावली मग मजला उन्हाने....

घेऊनि जगलो स्वप्ने "कलंदर" मी उरी..
झटलो करण्यास ती सारी मी पुरी....
घोट अश्रुंचे कधी मी प्यावयास मुकता..
दिले चार अश्रु मजला सुखाने....

तसा सदाच मी पावसात फिरलो..
कधी नाचलो तर कधी थेंब प्यालो....
ठेवुनि कोरडे मज जाता वृष्टी अति..
मला चिंब केले कोरड्या पावसाने....

घेतले श्वास मी जणु सारे शेवटचे..
क्षण मौल्यवानी ते नव्हते फुकटचे....
दर्शन होताच करता अभिवादन मी यमाला..
मला बक्षिले मग स्वत: नि - यमाने....

असा मी तसा मी कसाही राहतो..
तिमिरातही मी तेजालाच पाहतो....
कधी थांबता चालणाराच रस्ता..
पुन्हा दाविली मज वाट पावलाने....

वाहतो "कलंदर" मी नेहेमी प्रवाही
थांबतो रस्ता पण प्रवास चालुच राही
घेतो जरी उत्तुंग भरार्या आकाशात..
मजला फार प्यारा पिंजर्यातीलही एकांत..

---योगेश जोशी.

No comments: