आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, September 18, 2007

मराठी बोला रे.....

म्हातारा आजोबा हा
सांगतो गोष्ट ऐका रे
एका म्हाता-या महाराणीची
करुण व्यथा रे...

बोटांवर मोजण्या इतुके
दिवस तिंचे उरले रे
कोणाहि नको भाग्य
तसले तिंच्या पदरी पडले रे...

मातीत मिळाली संपदा
राज्य घरांतचं संकोचले रे
मुलं विसरली तिला
तुकाराम-समर्थांचे दिवस आता गेले रे...

नऊवारी जड वाटते
स्त्रीअंगाची खरी शोभा रे
मुलं तामसिक वृत्तीची
कसे भयावह स्वप्न पडले रे...

नको मरण हे रोजचं
एकदा कंठस्नान घाला रे
बाळांनो तुम्ही तरी
मराठी बोला रे.....

-- चेतन फडणीस

No comments: