आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, September 18, 2007

इतके दिवस विचार केला
सांगू का मी तिला
खूप भीती वाटत होती
ती आणेल् तिच्या भावाला

भावाने तिच्या घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला


रोज शेवटच्या बाकावरून
बघत् असे मी तिला
ती मात्र बघत असे
माझ्या बाजूच्या बाकावरच्याला

बाजूवाल्याने घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला


एके दिवशी विचार करूण
तिला गुलाब देऊ ठरविले
त्याच दिवशी मास्तरांनि
बारावीचे गुलकन्द् शिकविले

गुलकन्दाने घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला


कॅलेंडरात वॅलेंटाइन् डे दोन दिवसात
मग काय् सगऴ्यांबरोबर् मीही होतो कि जोमात्
पण दुसऱ्य़ाच दिवशीची खबरबात
म्हणे तीची पणजी गेली ढगात

पणजीने तीच्या घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला

कालच गच्चीवरती तीला पाठमोरी बघीतले
क्षणात माझ्या मनातले तिला सांगितले
पाठमोरी ती मूर्ति वऴताच त् त् प् प् झाले
कारण मला तीच्या आईचे दर्शन् झाले

आईने तीच्या घोऴ केला सगऴा बट्ट्याबोऴ केला

-- धनंजय सोनावने

No comments: