आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, August 14, 2007

इच्छेच्या ओंजळीत, का जमवतेस आशेची फुले

कधीचा पळतोय, मला दिशा माहीत नाही
आयुष्य गिळतोय, परिभाषा माहीत नाही

भास्करा तूही विसरलास का पुर्वेची वाट
अंधार छळतोय, मला निशा माहीत नाही

स्वप्न का पाहतेस उज्वल भविष्याचे
तुझ्या हातावरच्या, तुलाच रेषा माहीत नाही

का मागतेस देवाकडे, सात जन्मांसाठी मला
ह्या जन्माचा, का तुला तमाशा माहीत नाही

इच्छेच्या ओंजळीत, का जमवतेस आशेची फुले
नशीबाला पडलेल्या भोकांची, दशा माहीत नाही

मी कधी घेतली, पाय कधी पडले वाकडे
रस्ताच नव्हता सरळ, मला नशा माहीत नाही

मृत्यु तूही का, नेहमीच लपंडाव खेळतोस
माझ्या जिवनाची, तुला दुर्दशा माहीत नाही

माझ्या दु:खावर, जग सांडी मुक्त हास्य फुले
वेदनांची कोणालाच, का इथे भाषा माहीत नाही


@सनिल पांगे

No comments: