आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, June 12, 2007

सुगंधाने ज्याच्या, गंधित होई पहाट,

शुभ्र फुलांच्या वर्षावाने, न्हाऊनी गेली वाट,

ओंजळीत कुसुमे घेता, मन मोहरुनी जातं,

परड्यांत बहरला आहे, तो एक पारिजात


भल्या पहाटे माझी आई, फुले करंडीत वेचूनी घेई

हलकेच हवेची झुळुक, झाडाला छेडूनी येई,

नाजुकश्या त्या स्पर्शाने, प्राजक्त शहारूनी जाई

पडणाऱ्या त्या कुसुमांनी, भिजूनी गेली आई


दूर टेकडीमागे जो सूर्य दडला होता,

त्याने तिरप्या नजरेने प्राजक्त देखिला होता,

त्या अवखळ सौंदर्यावर तो सूर्य भाळला होता,

अनभिद्न पारिजात उगाच नटला होता.


दुपार होऊन जाता, रवी डोईवरती आला,

उद्देश तयाच्या मनीचा, प्राजक्ता उशिरा गमला

चहूबाजूंनी त्याच्यावर, किरणांचा हल्ला झाला

प्रखर रवीच्या तेजाने, पारिजात लुटुनी नेला


सांजवेळ ती येता, चंद्र साथीला होता,

लुटलेल्या प्राजक्ताला, तोची दिलासा होता

क्षितिजावर उमटली होती, सोनेरी तांबूस छ्टा

तो एक पारिजात, परड्यांत बहरला होता

No comments: