~:~ आजचे विनोद ~:~
एकदा एक अमेरिकन जोडपं भारतात येतं. त्यांचा इथला पर्यटन मार्गदर्शक एक सरदारजी असतो. सरदारजीत्यांना ताजमहाल दाखवतो आणि सांगतो, "हा महाल बांधायला ४ वर्षं लागली." अमेरिकन जोडपं म्हणतं, "अमेरिकेत हा २ वर्षांत बांधून झाला असता."नंतर सरदारजी त्यांना लाल किल्ला दाखवतो आणि सांगतो," हा किल्ला ३ वर्षांत बांधून झाला." अमेरिकन जोडपंम्हणतं, "अमेरिकेत हा १ वर्षात बांधून झाला असता"
हे ऐकून सरदारजी त्यांना धडा शिकवायचं ठरवतो। तो त्यांना कुतुबमिनारापाशी घेऊन जातो. अमेरिकनविचारतात, "हे काय आहे?" सरदारजी म्हणतो, "मला काय माहित? काल तर इथे काहीच नव्हतं !!!!"
एक सरदारजी दुस-या सरदारजीच्या कानात काय सांगतो की दुसरा सरदारजी जागेवरच मरतो !!!!!
ढिश्क्यांव !!!!
मी आणि माझा एक मित्र एकदा Bike वरुन जात होतो ,आणि समोरुन शांतपणे सरळ जात असलेल्या Premier Padmini चालवत असलेल्या माणसाने अचानक उजवीकडे वळण घेतले,कुठलाही सिग्नल न देता !!! आणि आम्ही जाऊन त्याच्यावर धड्कलो,कुणाला काही लागल नाही पण...
आंम्ही : काय रे,वळवताना सिग्नल देता येत नाही का !!!
तो : काय राव तुम्ही !! अख्खी गाडी वळताना तुम्हाला दिसली नाही ,मग सिग्नल कसा दिसला असता !!!
आम्ही याव्रर अगदी निरुत्तर झालो॥
चौखुरे गुरुजींनी वर्गात कोडं घातलं , '' मुलांनो , आपल्या वर्गात २५ बाकडी आणि ५७ मुले , तर समोरच्या पेरूच्या झाडाला आंबे किती ?''
नन्या चटकन उत्तरला , '' बेचाळीस. ''
गुरुजी म्हणाले , '' कसं काय ?''
नन्या म्हणाला , '' कारण मी आज डब्यात पोहे आणलेले आहेत!!!! ''
विक्रेता--- साहेब हि मुंग्यांची पावडर घ्या ना.
नको, मुंग्यांना वाईट सवय लागेल.
?????
आज पावडर दिली तर उद्या लिपस्टिक मागतील।
एकदा दोन भुते गप्पा मारत असतात.
एक भूताने दुसर्य़ाला विचारले,"काय रे, या जगात माणसे असतील का"?
दुसरे भूत म्हणाले,"छे रे।अंधश्रध्दा".
सरदार !!
एक सरदारजी एका केळ्याच्या सालीकडे बघून म्हणतो, " शी यार, आज पुन्हा घसरून पडावं लागणार !!"
No comments:
Post a Comment