आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, April 06, 2007

मराठी माणसाची दिनचर्या.....

मुख प्रक्षाळम दंतम घासम
कोलगेट हमाम बुडबुडभुशम
धिक तकवा तेलम टकलम
केशम नास्तिच अपि कंगवा फिरवम

पोटम पट्टम कच्चम आवळम
खिशस्य द्वि पेनम लावम
"वेळ झालाय ग चहा उकळम"
द्वारम आठवम किल्ली विसरम

किकम मारम घाम डबडबम
सिग्नल बघम आठ्या घालम
सहचालकस्य कुळम उध्दरम
अन्ती अष्टकाले ऒफिसम शिरम

खर्डे घासम डबा गिळम
चहा बरोबर धूम्रपानम
चार वाजता देई आळसम
पंच काले खुशीत दिसम

गॄहे सुखम सॊक्सम (Socksam) फेकम
पोह्यावरती तावम मारम
धिक तकवा तेलम टकलम
केशम नास्तिच अपि कंगवा फिरवम

भार्या मुलम बागम भेळम
रमतम गमतम चित्रपटम।


No comments: