~:~ खोपा ~:~
"अरे खोप्यामंधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलांसाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यांत
जसा झुलता बंगला
तिचा पिलांमधी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशींच चोंच
तेच दात तेच ओठ
तुला दिले रे देवानं
दोन हात दहा बोटं"।
No comments:
Post a Comment