आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, March 27, 2008

यु.के. चं वर्क-परमीट हाती आलं...
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

तेच टेकी काम पण इथे चौपट दाम,
हरखून जाती सारे आम्हीही हरखलो!
NRIs च्या त्या विलोभनीय यादीमध्ये,
सहज हळुवारपणे आम्हीही सरकलो!
आयुष्याचं आमच्या जणू सार्थक झालं,
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

कूकीज, मफ्फीन्स, ब्रेड आदी खुराक,
कॉर्नफ्लेक्स माझा आरोग्यवर्धक नाश्ता!
लंचसाठी असतो पिझ्झा किंवा बर्गर,
आणि डिन्नर म्हणजे बहुतांशी पास्ता!
आईच्या हातचं थालीपीठ दुर्मिळ झालं,
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

केसांचे स्पाईक्स व लोराईज जीन्स,
अस्सल ब्रिट शैलीत संभाषण करतो!
तरीही माझा तो गोरा शेजारी मात्र,
मला "देसी" या पदवीनेच संबोधितो!
मी नक्की कोण हे एक कोडंच झालं,
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

यु.के. चं वर्क-परमीट हाती आलं...
आणि आमचं घोडं थेम्समध्ये न्हालं!!

कवी: चंद्रजीत

No comments: