एकाएकी जाणीव होते की तिच्याशिवायही जगू शकतो
तिच्याशिवायही भर चांदण्यात गाढ झोप येऊ लागते
तिच्या आठवणीने येणारा शहारा उमटेनासा होतो
आता ती त्याच्या मिठीत नसतो, तो फक्त वाराच असतो
तिच्या नावाची हाक मारली तरी दचकेनासा होतो
तिच्यावरून चिडवलं तरी, आता तो लाजेनासा होतो
फोनची वाट बघत नाही, वर स्वतःचा एंगेज असतो
तिला reply करायला त्याच्याकडे balance नसतो
ती पिक्चरला बोलावते तेव्हां काम असते, मित्रांच्या गाठीभेटी असतात
अचानक घरी जायचं असतं अन त्याची बस लेट असते
मुद्दाम तिच्या ऑफिस वरून ऑटोही न्यायची नसते
ती काल काय करत होती याची नोंदही घ्यायची नसते
प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?
कुठे गेले ते मंतरलेले दिवस अन् धुंद रात्री
ती हुरहुर, ती जवळीक, ती लुटुपुटुची मैत्री
त्या हळव्या गोष्टी फक्त फक्त तिलाच सांगण
तिच्या त्याच्या स्वप्नांत दिवस दिवस रमण
खूप भूक लागली असून अर्धा अर्धा वडापाव खाण
जेव्हा केव्हा भेटेल तेव्हा तेव्हा choclate देणे
कितीहि boring picture असला तरी तिच्या हट्टाखातर पाहणे
ती रुसली की अस्वस्थ होणे, तिला मनवणे, लाड करणे
प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?
कवि: अद्न्यात
स्त्रोत: ई-पत्र
No comments:
Post a Comment