आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, March 06, 2008


श्री स्वामी समर्थ। करता स्मरण।
रोमांचते मन । पाप्याचेही॥
आम्ही काय केले। दंभ मद गर्व।
अंगी पापे सर्व। वागविले॥
सर्वत्र संपूर्ण। ऎकतो श्रवणी।
पाहतो नयनी। स्वामी मुर्ति॥
भक्तांचे जिवन। चरणीचे रज।
चालविसी काज। देहाचे या॥
जपतप केले। तिर्थयात्रा केली।
सर नाही आली। तूझी कुणा॥
आजाणूबाहू हे। स्वामी यतीश्वर ।
साक्षात ईश्वर। श्री समर्थ॥
मंगल चरणी। केला शब्दाभिषेक।
झाला प्रसादिक। जन्म माझा॥
तुझिया दासांचा। करी मला दास।
नको वनवास। वासनांचा॥
कर्णी कुंडले ही। गंध टिळा भाळी।
वटवृक्षातळी। योगी मुर्ती॥
अन्नक्षत्रामध्ये। घेतला प्रसाद।
मिटला प्रमाद। संकटांचा॥
अंती कोणी नाही। जाणूनी मानसी।
शरण तुझसी। आलॊ बापा॥
अजाण बालक। घडती आपोआप।
बैसले येथे बाप। सर्वांचेच॥
वटवृक्षातळी। अवतरले स्वामी।
काय आता कमी। आम्हाला हे॥

स्त्रोत: अक्कलकोट मठातील एक पाटि..

No comments: