आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, March 06, 2008

नजरेत भाव सारे
हा नजरेचा वार आहे
अजुनी ती शोधते स्वर
इथं अंतरा तयार आहे

हा पुन्हा आला बहर
सवे निखाराही पेटला
माझ्या जिंदगीशी प्राक्तनाचा
हा कुठला करार आहे?

मी कधीच विसरलो सारे
का तुझी ही फिर्याद?
नको साक्ष जुन्या आठवांची
मज दुखणी हजार आहे

काय हा माझा प्रवास?
काय या पावलांची दशा?
मागे रखरखत्या उन्हाची वाट
अन, पुढे अंधार आहे

"हा सावल्यांचा खेळ" सारा
अन, वेळ आहे कातराची
डोळ्यात साचतो गारवा
पण अंतरी अंगार आहे.....

-सचिन काकडे [ मार्च ५,२००८]

No comments: