आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, March 06, 2008

|| श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र ||

नि:शंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविना काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला ॥२॥
उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥
खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ॥४॥
विभूती नमन नाम ध्यानांदी तिर्थ
स्वामीच या पंचप्राणामृतात
हे तीर्थ घेई, आठवी रे, प्रचिती
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥५॥

श्री स्वामी चरणाविंदार्पणकस्तु

No comments: