पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली
चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली
गाभार्यात पेटलेले निरांजन तेलवातीचे
गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली
हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला
कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली
ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली
गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली
वारकर्यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली
दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली
कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे
बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली..
-ऋषिकेश
स्त्रोत: http://www.misalpav.com/node/712
No comments:
Post a Comment