आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 08, 2007

तुझ अस कापरासारख विरघळण,
मला अजिबात आवडत नाही.....
गन्ध दरवळुण गेल्यावर
मागे काहिच उरत नाही।

तु बुडताना मी
तुझ्याकडे धावलो ते
मदतीला नव्हे तर सोबतीला
नाहितर मला तरी कुठे येत पोहायला

हळुवार दूर सार त्या
माझ्या कुरळ्या बटांना ....
कारण मलाही डोळ्यांत डोळे
घालुन वाचायचय तुला....

पाऊलखुणा माझ्या
तु हळुवार कुरवाळतेस..
तुला काय सांगू
मनाला माझ्या तु अश्याच गुदगुल्या करतेस...

तुझ्या स्पर्शाची लक्ष्मणरेषा
मला जाणवलीच नाही..
प्रेम इतकं आतुर झालं होतं
त्या मिलनाच्या रातीत..
कि कुठल्याच भितीने मला क्षणभर सुद्धा हिनवलं नाही।

तुच माझ शहरं
अन तुच माझा गाव..
हरवलो आहे मी मृगनयनात तुझ्या ..
तुच माझिया मनाचे अचूक ठाव

तुझ्या कर्णपटलावरी..
ओठांनी माझ्या विसावा घेतला..
किती अजब होता तो क्षण ..
तुझ्या स्पर्शानेच माझ्या प्रेमाचा मागोवा घेतला॥

तुझा आधार
माझ्या जगण्याला..
निराधार झालेल्या
एकट्या चांदण्याला॥


No comments: