आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 08, 2007

तुझं चांदण
माझिया आंगणात...
मलाचं खुणवतय..
इशारयाची अल्लड खाणाखुणानी
मला आणखी उजळवतय...

निशेच्या सोबतीला
हवी आहे चांदण्याची सैर..
तु सुंदर आहेस हे सांगताना
घेतले होते मी त्या चंद्राशी वैर

हि रात चांदण्याची..
चकवणारया काजव्यांची..
मग तुझे तेज पाहूनी आली आठवण..
माझ्या मिठीत येणारया अवखळ चांदनीची

कधी कधी भासते तुझं प्रेम..
मॄगजळाचा आभासी खेळ...
पण माझिया अस्तित्वास जागं करूनी
म्हणतेस आता एकरुप होण्याची आलीया अचुक वेळ...

आपल्या प्रेमाची अनोखी भागिदारी..
जिथे नाही नफा नाही तोटा..
तरीही किती अजब हे अश्चर्य
आपल्या प्रेमाचा आलेख किती झालाय मोठा॥

गुतंत गेले प्रेम आपुले..
अन भावनांचा गुंता वाढत गेला..
तुझ्याविना माझं काहीच नाही
हे समजवताना अश्रूंचा पूर दाटतचं गेला॥

तुझं असं वागण..
मला अस्वस्थ करतं..
मनाच्या भावनांना मग..
पापण्यांच्या काठाला पुरतं भिजवत॥

कधी कधी वाटतं
माझ्या प्रेमाचं ओझ तर होत नाही ना.. ?
माझ्यासंगे चालताना
तुझे लक्ष तुझ्यापासून दुरावत तर नाही ना।

प्रेमात सहन करणं
अवघड असतं हे खरं...
पण त्याशिवाय का
खरं प्रेम निभवता येतं बरं...

तुला हवं मिळेल..
अशी ग्वाही मी देतो..
कारण तुझ्याचं सुखाच्यां लाटांवर..
माझ्या जिवनाचे जहाज मी तरंगवतो॥


No comments: