आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 08, 2007

ती मधूचंद्राची मैफील
फक्त माझी अन तुझीच होती..
स्पर्श माझे झाले होते सुर..
अन थरथरणारे अंग तुझे त्याला मिळालेली दाद होती...

स्पर्श तुझा होताच..
मदन माझा गहीवरला..
क्षण तो मिलनाचा पाहुनी..
मधूचंद्र ही लाजुन गेला...

शब्द माझे खेचतात तुला..
ये जवळी ये माझ्या फुला..
हळुवार कुरवाळुनी...
माझ्या कुशीत निजवतो तुला...

मिठीत येताच तु..
रात्रगंधार माझा जागा होतॊ...
कितीही आवरले त्याला तरी..
तो पहाटेलाच शांत होतो...

स्पर्श म्हणजे..
कधी न संपणारा हर्ष..
तुझ्या माझ्या प्रेमाच..
असेल हे आणखी एक रहस्य...

कधी कधी तु ही
माझ्या कुशीत येऊन लाजावं..
माझ्या या प्रेम वर्शावात..
तु चिंब ओलं होऊन भिजाव...

लाजून लाजून गेलोय भिजून..
आता आलाय शहारा अंगावर
कोण सावरणार आता ह्या घडीला..
असचं होतं जेव्हा दवं हलूच स्पर्षितो गुलछडीला...

तुल्या भेटण्याआधी
घाबरलो होतो खुप...
तुला भेटल्यावर मात्र..
डोळे दिपून गेले पाहूनी तुझे परीसमान सुंदर रुप॥

त्यांच्या मते तुझ हसणं...
फार दुर्मिळ असतं..
खुळचं ते...
त्यांना काय ठाऊक..ते फक्त
माझ्यासाठीच तर आरक्शीत असतं...

तुझ्या चेहरयावर येणारया
तुझ्या त्या नाजूक बटा मला फार सतावतात..
कारण तुझ्या डॊळ्यात पाहण्याचा..
माझा हक्कच ते हिरवतात...

तुझं एक हसू तुझं सारं सौंदर्य
तुझ्या गालाच्या खळीत एकवटतं
मला मात्र ते एका क्शणात
कापरासारखं विरघळवतं


No comments: