एकदा तरी मला तुला,
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...
फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...
फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...
फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...
मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...
तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...
No comments:
Post a Comment