वाटणारी प्रत्येक गोष्ट शब्दात मांडता आली तर
मनातली प्रत्येक भावना बोलून दाखवटा आली तर
तुझ्या स्पर्श्याशिवाय ही मला शहारता आले तर
बरोबर पहिलेल्या स्वप्णाना विसरता आले तर
घेतलेल्या सर्व शपथाना मोडता आले तर
समोर पाहून ही तुला टाळता आले तर
तूच डाव मोड्लस हे मनाला सांगता आले तर
तुझ्या इतके नाही पण थोडे फार तुझ्या सारखे वगता आले तर
प्रेमाला खेळ समजून पुन्हा पुन्हा डाव मांडता आला तर
नाही जमणार हे मला माहीत आहे
पण काही ही करून तुला विसरता आले तर
किती बरे होईल तुझ्याशिवाय जगता आले तर
सुखी होईल मी जर तुला विसरता आले तर
विसरलोय तुला हे सहज सांगता आले तर
तुज्याशिवाय ही जगू शकतो हे पटवून घेता आले तर
तू नसताना ही हासतो आहे आसे भासवाता आले तर
तू आता माझी नाही हे मनाला बजावता आले तर
सुखी होईल मी जर तुला विसरता आले तर
No comments:
Post a Comment