तुझा आवाज ,तुझा शब्द
किती मोहक आहेत...
खुप धावल्यावर कळत
अरे हे म्रुगजळ आहे।
शब्द तुझ्या मनातले
प्रेम तुझ्या ह्रुदयातले ,
ह्याहुन जास्त नाही मागत
प्रिया मी तुझ्याकडे !!!
तुझ्या पावलांनवर
पाउल टाकत चालताना
सहजच मागे वळुन पाहिल्यावर जाणवल
माझ अस्तित्व तुझ्यात एकरुप झालेल.....
तुला न बघुनही बघितल्यासराख वाटत
तुला न स्पर्शहुनही स्पर्शिल्यासारख वाटत.....
खर सागं तु आहेस तरी कोण?
एक सत्य कि एक हवहवस सुन्दर स्वप्न !!!
पहाटेच्या दवबिंदुत
प्राजक्त नाहलेला,
रात्रीच्या मिलनाने
तृप्त पहुडलेला
चान्दण बेहोश होताना
तु कधी पाहिलसं???
तु बघितल नसलं ना
तरी मी ते अनुभवलय!!!
प्रेमाचा दिवस अपुरा पडला..
तुला आपलसं करताना...
खरं सांगू एक इतिहासच घडला..
तुझ्यासाठी जमान्याशी लढताना...
तुझ्याहुन सुंदर मला
असे काहीच भासत नाही..
स्वर्गाच्या अप्सरांचा मत्सरसुदधा..
तुझ्या अस्तिवाच्या सौंदर्याला नजर लावू शकत नाही...
सतत तुझ्या आठवणीने
मना काहूर काहूर लागते..
मग क्षणोक्षणी साजने..
फक्त तुझीच उणीव भासते...
तो सागरी किनारा
अन अंगाला छेडणारा खट्याळ वारा..
मग शहारलीस तु...
जेव्हा स्पर्शल्या माझ्या सहवासाच्या ओल्या चिंब गारा....
मृग नयनेची अनोखी चाल..
संगिताला तुझ्या सुंदर असा ताल..
घायाळ केलेस तु सोडुनी प्रेमाचा तो तीर..
साजनी इतके का केले आहे तुझ्या आठवणीने मला बेहाल...
तुच माझी चांदणी रात..
अन तुच माझी मंद वात..
आतुरलेल्या माझ्या चातकाला..
तुझ्याच चिंब ओल्या सरींची साथ...
बहरलेली रात्र,
भिजलेली गात्रं ,
रातराणिचा मादक गंध,
अन् आपण असे काहिसे धुंद....
किती मोहक आहेत...
खुप धावल्यावर कळत
अरे हे म्रुगजळ आहे।
शब्द तुझ्या मनातले
प्रेम तुझ्या ह्रुदयातले ,
ह्याहुन जास्त नाही मागत
प्रिया मी तुझ्याकडे !!!
तुझ्या पावलांनवर
पाउल टाकत चालताना
सहजच मागे वळुन पाहिल्यावर जाणवल
माझ अस्तित्व तुझ्यात एकरुप झालेल.....
तुला न बघुनही बघितल्यासराख वाटत
तुला न स्पर्शहुनही स्पर्शिल्यासारख वाटत.....
खर सागं तु आहेस तरी कोण?
एक सत्य कि एक हवहवस सुन्दर स्वप्न !!!
पहाटेच्या दवबिंदुत
प्राजक्त नाहलेला,
रात्रीच्या मिलनाने
तृप्त पहुडलेला
चान्दण बेहोश होताना
तु कधी पाहिलसं???
तु बघितल नसलं ना
तरी मी ते अनुभवलय!!!
प्रेमाचा दिवस अपुरा पडला..
तुला आपलसं करताना...
खरं सांगू एक इतिहासच घडला..
तुझ्यासाठी जमान्याशी लढताना...
तुझ्याहुन सुंदर मला
असे काहीच भासत नाही..
स्वर्गाच्या अप्सरांचा मत्सरसुदधा..
तुझ्या अस्तिवाच्या सौंदर्याला नजर लावू शकत नाही...
सतत तुझ्या आठवणीने
मना काहूर काहूर लागते..
मग क्षणोक्षणी साजने..
फक्त तुझीच उणीव भासते...
तो सागरी किनारा
अन अंगाला छेडणारा खट्याळ वारा..
मग शहारलीस तु...
जेव्हा स्पर्शल्या माझ्या सहवासाच्या ओल्या चिंब गारा....
मृग नयनेची अनोखी चाल..
संगिताला तुझ्या सुंदर असा ताल..
घायाळ केलेस तु सोडुनी प्रेमाचा तो तीर..
साजनी इतके का केले आहे तुझ्या आठवणीने मला बेहाल...
तुच माझी चांदणी रात..
अन तुच माझी मंद वात..
आतुरलेल्या माझ्या चातकाला..
तुझ्याच चिंब ओल्या सरींची साथ...
बहरलेली रात्र,
भिजलेली गात्रं ,
रातराणिचा मादक गंध,
अन् आपण असे काहिसे धुंद....
No comments:
Post a Comment