आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 08, 2007

सप्तरंग त्या इंद्रधनुचे..
नयनात तुझीया पाहीले..
अवखळ ते दिव्य तेज पाहूनी..
आनंद अश्रु नयनी माझ्या वाहीले

स्वरवेली हि नवनवेली..
तुझीया कठांतुनी जन्मली..
स्वरवेड्याने मग तुझ्यावरचं
सुरांची उधळण केली॥

नवनवलाईचा मंत्र घेवूनी
स्वर कवितेचे आले..
तुझे माझे नाते
बघ कसे गीत-कवीता जाहले...

आस्वाद प्रेमाच्या वडीचा..
गोड गुलाबी गुलछडीचा..
चला आनंदाने गाऊया..
श्रावणधारा होऊनी बरसुय़ा...

मनामनाची नाती
अन भावना त्यात वाहती..
असाच चालतो नित्यनेम..
काय हो ह्यालाच म्हणतात का प्रेम?

फुलांची आरास ..
सजवुनी ठेवलीया दारात...
अगं ये ना सजने..
ते माप ओलांडुन कायमची माझ्या घरात...

चांदण्यारात्री असेच घडायचे..
मी तुझ्या अन तु माझ्या कुशीत निजायचे..
मला तेव्हा काहीच कळत नव्हते..
पण वरती आकाशात चंद्र चांदणीचे असेच मिलन घडायचे॥

कोरया कागदावर काय लिहायचं..
या विचाराने डोकं खाजवलं..
पण लेखनीने कागदावरचं प्रेम..
शब्दाच्या आधाराने अचुक सांगितलं

तु येण्याची चाहूल लागताच..
मन वारयासवे डॊलू लागले..
शब्द हे माझे...
मग सुरेल गीत बनू लागले...

हट्ट असा तुझा..
कि मिठीत येऊन शांत बसायचे..
तुझ्या ओठांना आवर आधी...
त्यांनी सुरू केलयं सत्र मला गुपचुप खुणवायचे...


No comments: