लहान असताना..तुझ्याबरोबर
भातुकलीच्या खेळात रमायचो..
आता कळायला लागले तर..
माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला सुद्धा दचकायचो॥
स्पर्श माझा..
तुला हवाहवासा...
जसा हवेला छेडणारा..
मंद गारवा साजेसा॥
तुझ्याशिवाय जगणं
व्यर्थच आहे म्हणा..
कारण तु काही बोलली नाहीस तरी
जगवतात मला तुझ्या त्या प्रेमाच्या खाणाखुणा॥
प्रेम माझं
हे असचं असतं..
कुठे कपारीतला पाझर
तर कूठे कुठे प्रेमरसाचा सागर असतं
उमलणारं फुल तु..
त्याला सुगंधाची लहर..
तुझं असं रूप पाहूनी..
शरीरात येतो नुसता प्रेमाचाच कहर॥
मनाची तळमळ..
जशी शिशिराची पानगळ..
मग तुझ्या स्पर्श..
जशी सृष्टिला हिरवाईची भूरळ...
तुझ्या गळामिठीणं..
डोळ्यात चांदण चमकलं..
तुझ्या चुंबनाने तर..
चंद्राला मधानेच भिजवलं॥
गरजणारे ढग ..
कोसळणारा पाऊस..
माझ्या मनाला सुद्धा ..
तुझ्या प्रेमवर्षावाची भलतीच हाऊस॥
तुझे केस वारयाने उडायचे
अन् मी त्यांना हाताने अलगद सावरायचे..
मग अचानक् ओठांना एवढे
धाडस् कुठुन यायचे कुणास ठाऊक
कि ते थेट ओठांवर जाऊनच विसावयाचे....
श्रावणातील रिमझीम
धारा बरसत होत्या
आभळाचा निरोप
धरणीला देत होत्या !!!
विचार करतेय...
अपुर्ण अध्याय पुर्ण करावा
नेहमीचा गोड शेवट नसुनही..
शेवटचा शेवट आपण करावा
आता हे नेहमीचच झालय
रात्र जागवुन काढणे..
अनावरुन येणारे हुंदके
ओठांतच दाबणे
No comments:
Post a Comment