पावसाळ्यातील पत्रे .....आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींनी मला अक्ष्ररशः वेड लावलंय त्यापैकी एक तू आणि दुसरा पाऊस! तुम्हा दोघांचीही उणिव मला मरेपर्यंत सतावत राहील. एकवेळ पावसाचं मी समजून घेउ शकतो पण तुझ्याशिवाय....... पावसाचं हे वेड मला अगदी लहानपणापासूनच. पण तुझ्याबरोबरचा तो पाउस फार वेगळाच होता. मी अनेक पावसाळे भिजलेलो पण तो पाउस मी मनाने, तनाने आणि तुझ्या प्रेमवॄष्टीने न्हाउन गेलो होतो. पहिल्या प्रेमातला पहिलाच पाउस, मी कधीही विसरू शकत नाही ते क्षण! आणि आठवतं तुला? अशाच एका वर्षासंध्येला आपण रेडीओ क्लबच्या समुद्रावर उभे होतो. पाउस नुकताच पडून गेलेला तरीही त्याची रिमझिम सुरुच होती. तु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उधाणलेल्या समुद्राला बघण्यात मग्न आणि मी तुझी शांत चर्या न्याहळण्यात मग्न. माझा हात तुझ्या कमरेला वेढा घालून तुझ्या हातात असलेला. प्रत्येक लाटेबरोबर तू तो अजुनच घट्ट धरलेला. गार वाऱ्याची झुळुक तुझ्या मानेवरच्या केसांना माझ्या चेहऱ्यावर आणून अलगद सोडते. मी तुझ्या स्पर्शाने बेधुंद झालेला. हळूहळू काळोख पडू लागतो पण पाय जागेवरून हालत नाहीत. अचानक! एक गार वाऱ्याचा झोत वेगाने अंगावर येतो, तो तुला सहन नाही होत तु लगेचच मला बिलगतेस आणि थरथरणारे तुझे ओठ माझ्या ओठंवर ठेवतेस २, ३.. ४ किंवा ५ सेकंद!!!!! पण तो क्षण कधी संपू नये असं वाटत राहतं! तुझी मिठी, तुझा स्पर्श, तुझा सुगंध माझ्या रोमरोमांत अगदी एखाद्या जालीम विषासारखा भिनत जातो आणि मी त्या विषाने मंत्रमुग्ध होउन तुझ्या मिठीत जगू लागतो. प्रेमाचे हे सारे क्षण मला आजही वेड लावतात. तु नसतानाही तु असल्याचे भास होतात. तु गेल्यापासून प्रत्येक पाउस मी असाच तुझ्या आठवणींनी भिजतो. एकदा ना मला ह्या पावसांच्या सरींच्या प्रवाहात वाहून जायचयं कुठल्यातरी वळणांवर तु भेटशील या आशेवर! |
आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Monday, July 13, 2009
पावसाळ्यातील पत्रे .....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment