आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 07, 2008

लागते अनाम ओढ श्वासाना


लागते अनाम ओढ श्वासाना .... अद्न्यात अश्या काही ओळी

लागते अनाम ओढ श्वासाना, येत असे उगाच कंप ओठांना, होई का असे तुलाच स्मरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा..
शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा!

एकांती वाजतात पैजणे, भासांची हालतात कंकणे, कासावीस आसपास बघताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद..
नको म्हणून गेलीस, तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद!

मी असा जरी नीजेस पारखा, रात्रीला टाळतोच सारखा, स्वप्न जागती उगाच निजताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन...
शब्दच नव्हे, मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कोठून?

आज काल माझाही नसतो मी, सर्वातुन एकटाच असतो मी, एकटेच दूर दूर फ़िरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

1 comment:

आशा जोगळेकर said...

छानच पण आवाज कुठाय़ ?