आधीच माझं आयुष्य म्हणजे
उत्साहात उजाडणारी पोर्णीमेची पहाट होती
तेव्हाचं तुझं माझं प्रेम म्हणजे
त्वेषात वाहणारी भरतीची लाट होती
सांग ना सखे ती लाट भरतीची
पुन्हा तशीच वाहील का ?
सांग ना सखे ती पहाट
पुन्हा माझ्या आयुष्यात येईल का?
तेव्हा तु एकाच शब्दातला
कोवळा विश्वास मला दिला होतास
कोंडलेल्या त्या मनातला सखे तु
मोकळा श्वास मला दिला होतास
आज तु दिलेल्या त्या कोवळ्या
विश्वासाची कसोटी आहे
कारण आज माझ्या
आयुष्याला श्वासांची ओहोटी आहे
सांग ना सखे तो मोकळा श्वास
माझं मन पुन्हा घेईल का ?
आता तुझ्या आठवणीच्या लहरींचा पदर
बघ कसा स्पर्शतो बेधडक मनाला
त्या आठवणींची भेदणारी नजर
सोसणारा सखे मीच तो खडक ओसाडलेला
ओसाडलेल्या त्या खडकावर अलगद पेमळ
लहरींचा हात तु पुन्हा फिरवशील का?
विस्कटलेल्या आठवणींचा निथळ शब्द
सांग ना सखे तु पुन्हा गिरवशील का?
——सचिन काकडे
No comments:
Post a Comment