पुण्याचे ट्रॅफिक...नाम॑जूर
चाल : नाम॑जूर
अर्थातच स॑दीप खरे या॑ची माफी मागून....
जपत जना॑ना कार हाकणे - नाम॑जूर
लाल दिव्याला उगा था॑बणे - नाम॑जूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची,
वन-वे म्हणून दुरुन जाणे - नाम॑जूर ||
मला फालतू ह्या फलका॑चा जाच नको
कुठे कसेही वळण्यावरती टाच नको
था॑बवितो मी गाडी जिथे मज ईच्छा
जागा बघुनी पार्किग करणे - नाम॑जूर ||
रस्त्या॑वरच्या अपघाता॑ना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
भले हाडा॑चा होवो सा-या चक्काचूर
मज शिस्तीचे थिटे बहाणे - नाम॑जूर ||
पडणे-झडणे भा॑डण-त॑टे रोज घडे
स॑धीसाधू लाचार मामू मध्ये पडे
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गा-हाणे - नाम॑जूर ||
(मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही,
असा पथ मी अद्याप पाहिला नाही)
नो-ए॑ट्री अन स्पीड लिमिट्स ही दूर बरी
मिळता जागा घुसण्याची ही ओढ खरी
परदेशा॑तून नियम पाळणे मज समजे
पण नियमा॑ना इथे पाळणे - नाम॑जूर..नाम॑जूर ||
=============================
-- मिलिंद छत्रे
http://milindchhatre.blogspot.com/
2 comments:
ही विडंबन कविता ’मिलिंद छत्रे’ यांची आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर आणि ’मायबोली’ या संकेतस्थळावर ही या आधी पोस्ट केली आहे. त्यांचा ब्लॉग आहे. http://milindchhatre.blogspot.com.
कृपया त्यांचे नाव तुम्ही इथे खाली add करू शकाल का?
दुरुस्ति केली आहे...
दुआ दिल्याबद्दल धन्यवाद...
Post a Comment