आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, October 31, 2007

सकाळी सकाळी
मिशरीने दात घासत,
तुला गोठ्यात शेण काढताना
चोरून पहाया लय मजा यायची...

भिताडावरुन टांग टाकून
तुला चुलीच्या म्होरं
थपा थपा भाकरी थापताना
चकण्या डोळ्यानी पहाया लय मजा यायची...

शाळंत जाता जाता
तुझ्या मागं उभा राहुन
तुझ्या डोकस्याच्या शेंड्या
घडी घडी वढाया लय मजा यायची...

शाळंत आलं की
त्या खडुस मास्तराला डिवचत
तुझ्याकडं बघतं बघतं
त्याला वाकुल्या दाखवाया लय मजा यायची..

सांजच्यापारी शाळा सुटली
कि म्हशीच्या पाठीवर
तुला न्यार बसवून
म्हशीला पळवाया लय मजा यायची...

वाटत चिचाच्या झाडाखाली
थांबवून तुला चिचा खायची
लय भारी हावूस होती..
तुझ्यासाठी शेंड्यावर चढाया लय मजा यायची..

रातीला झोपायची आंगणात
आयशीच्या मायाळू कुशीत
हळूच सपरावर बसून
तुझ्यासाठी बासरी वाजवाया लय मजा यायची..

आता न्हाय ती मजा
अन न्हाय मी तुझा तो राज्या
आता म्या तुझा होनार दादल्या
अन वाजल आपल्या लग्नाचा ढोलीबाजा...

-- आ.. आदित्य...

No comments: