आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे

बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, October 18, 2007

त्या रेतीत खूप किल्ले बांधले होते
त्यात खेळण्यात संबंध दिवस घातले होते
पणं एकाएकीच तू मला सोडून गेली
जशी काही हातातून रेत सुटून गेली

आता तिला आपली आठवण राहाण्यासाठी तिथेच घुटमळतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......
त्या दमट हवेत आपण दिवसभर रहायचो
तुझी वाट पाहत मी तिच्याशीच बोलायचो

पणं एकदमच तू मूक झाली
जशी ती हवा वाहाण्याचंच थांबली
आता तिला एकटं न पाडण्यासाठी तिच्याशीच खेळतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......

आठवतंय, तिथे एक खडक होता
ज्याच्याशी आपला बंध जुळला होता
पणं त्याला तू खूप रडवलंस
जसं काही प्रारब्धात अडकवलसं

आता तो आणि मी रडून रडून रोज थोडा झिजतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......
एक सांगू, आपण सोबत असताना त्यात भरपूर पाणी होतं
कडक उन्हातसुद्धा आपल्या प्रेमाच्या वर्षावाने वाढतच होतं

पणं यंदाच्या उन्हाळ्यात हा पाऊसच थांबला
मग पाण्याचा ओघ आपोआप आकाशाकडे धावला
आता ते पाणी कमी होऊ नये म्हणून माझे अश्रू मिसळवतो
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......

म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......
म्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......

-- निलेश कोटलवार

No comments: