आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, May 04, 2007

~:~ आयुष्य ~:~

हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

कधी ते मजेत चालत असत
कधी मजेची सजा बनुन जात
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

कोणी रात्री चन्द्र पाहून झोपतो
सकाळचा सूर्य पाहायला मात्र नसतो
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

घरचे आवरुन कामावर निघुन जातो
परतीचा रस्ता तो कसा काय चुकतो?
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

नवपालवी फ़ुटताना दुष्ट भ्रमर येतो
एका क्षणात सर्वस्वी नाश करुन जातो
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....

फ़ुल कितीही गुणी अन सुन्दर असल
तरी फ़ान्दीवरुन त्याला उतरावच लगत
अन माणसाच्या मनात नसताना
या जगातून जावच लागत
हे आयुष्य असच असत?
आज असत तर उद्या नसत....

No comments: