आजकाल मन कशामधेही रमतच नाही
आजकाल मज जीवन जगणे जमतच नाही...
आजकाल मज पत्र कुणाचे येतच नाही
चुकून आले, तर मी उत्तर देतच नाही...
आजकाल बाहेर कधी मी पडतच नाही
माझे, दुनियेशिवाय काही अडतच नाही...
आजकाल डोळ्यांना येते सहज रडू
पाण्याचेही घोट लागती जहर कडू...
आजकाल मी आठवतो गेलेला 'काल'
स्वप्नांना मी विचारतो,"लागेल निकाल?"...
आजकाल मी कविता करतो भारंभार!
लोक बोलती काळजी करत, "जरा सुधार"!
आजकाल मज जाणवतो माझ्यात बदल
जीवन माझे झाले आहे 'चाल-ढकल'...
आजकाल मज जीवन जगणे जमतच नाही...
आजकाल मज पत्र कुणाचे येतच नाही
चुकून आले, तर मी उत्तर देतच नाही...
आजकाल बाहेर कधी मी पडतच नाही
माझे, दुनियेशिवाय काही अडतच नाही...
आजकाल डोळ्यांना येते सहज रडू
पाण्याचेही घोट लागती जहर कडू...
आजकाल मी आठवतो गेलेला 'काल'
स्वप्नांना मी विचारतो,"लागेल निकाल?"...
आजकाल मी कविता करतो भारंभार!
लोक बोलती काळजी करत, "जरा सुधार"!
आजकाल मज जाणवतो माझ्यात बदल
जीवन माझे झाले आहे 'चाल-ढकल'...
-- अजब॥
No comments:
Post a Comment