माध्यमाशिवाय दिसत नाही,
जरी प्रकाशाला असे प्रचंड वेग ...
माध्यमाशिवाय ऐकू येत नाही,
जरी ध्वनीला असतो त्याचा वेग...
प्रेम उचंबळून येत नाही,
जर प्रेमात नसला आवेग ...
भजन रंगून जात नाही ,
ह्रुदयात नसला जर आवेग ...
वक्त्याला हवेत समोर श्रोते ,
श्रोत्याना समोर वक्ता हवा ...
शिकणारे हवेत विद्यार्थी ,
विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हवा ...
सदैव मित्र असतो मित्रासाठी,
क्षण आनंदे जगण्याचे माध्यम ...
जीवात्मा परमात्मा मिलनासाठी,
प्रेमपूर्ण भक्ती हेच माध्यम .....
कवी: अरविंद चौधरी
No comments:
Post a Comment