हवं ते मिळालं की ,
बाळ खुश होऊन जातं . .
बाळ गोड गोड हसून
आपल्याला ही खुलवतं ....
हवं ते मिळालं तरी ,
आपण नाखुशच असतो ...
पळत्याच्या पाठीमागे
सारखे धावत असतो....
आनंदाचा क्षण काही
टिकवून ठेवता येत नाही . .
दैवाला दूषण देवून
हव्यास सोडता येत नाही ....
हृदयात डोकावून पाहिले
तर कारुण्य खूप दिसते...
पण तेवढीच जागा ही
आनंदाने व्यापलेली असते....
जावू नये दु:खाने पोळून
की सुखाने खूप हूरळून ...
शांत शांत वाटेल बघा,
दोघांचा समतोल ठेवून ....
कवी: ..........
No comments:
Post a Comment