आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, October 09, 2007

आता तुझी माझी
वाट वेगळी होणार

माझे मन मात्र
तुझ्या मागे जाणार

पुढचा प्रवास आता
एकट्याला करावा लागणार

वाटेवरच प्रत्येक पाउल
जड मनाने पडणार

पडणाऱ्या पावला बरोबर
तुझ्या आठवणी येणार

तू बरोबर नसणार
म्हणुन मनोमन रडणार

माहीत होत मला
कधीतरी हे होणार

एका वळणावर
दोघे वेगळे होणार

म्हणुनच तू जातांना
चेहऱ्यावर हसू आणणार

डोळ्यांमधलं पाणी लपवून
तुला अलविदा म्हणणार

वाट बघितली असती पण
तू नाही येणार

म्हणुनच तू जाईपर्यंत
डोळे भरून पाहणार

कवी: ..........

No comments: