आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, August 27, 2007

जवळ माझ्या नसलीस तरी…
सहवास मला तुझा आहे…
एकल्या ह्या जिवाला….
साथ फक्त तुझीच आहे….

संध्याकाळच्या वारया सोबत…
मी तुझाच गंध अनुभवत असतो..
व्याकुळ करते तुझी आठवण..
अन श्वास घेणेही मी बंद करतो…

उघड्या डोळ्यांसमोर माझ्या…
तुझ्या आठवणींच पडदा पडतो….
जगाचा विसर पडतो मला…
असा तुझ्यात मी गुंततो

तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण…
माझ्या हृदयातुन पाझरतो…
अन विरह दु:खाने मग…
तोच गालावर ओघळतो…..

ही ओढ कसली लागली मला…
हे मला न उमजे….
सांग सये यालाच का…
प्रेम म्हणतात सारे…?

No comments: