आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, August 21, 2007

माझ्याशी थोडं बोलून घे तू
सये मला थोड्सं बघून घे तू
आज आहे मी...माझ्याशी थोडं जगून घे तू

दॄर मी जेव्हा होईल
आसवं दाटुन येतील नयनी
आज आहे मी...माझ्याशी थोडं हसून घे तू

तुझ्या रागातही खोट्या
सये प्रेम मला मिळतं
खोटं खोटंच आज..... माझ्यावर रागवून घे तू

तूझ्या प्रेमाच्या खातर
साजेसं काय ग माझ्याकडं
एक कर तू....तूझ्याच मला आज मागून घे तू

मी पतंग सये
प्रेमवेडा तुझ्याचसाठी
एक क्षण दे...क्षणभर माझ्यासाठी सये जळून घे तू

-- संदीप सुरळे

No comments: