आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, July 19, 2007

आधुनिक युगाच्या या यंत्राविषयी,
पेपरात सर्वप्रथम जेव्हा वाचले,
त्या बद्दलचे चर्चासत्र,
जिकडे-तिकडे सुरु झाले.

सुरुवातीला लोकांचा,
विश्वासच बसत नव्हता,
बिन वायरीच्या फोनचा,
त्यांनी कधि विचारच केला नव्हता.

हळु हळु जेव्हा,
त्याचा वापर सुरु झाला,
माणसाच्या जीवनाचा एक,
अविभाज्य घटकच बनला.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,
कामगारांपासून ते मालकांपर्यंत,
रिक्षाचालक ते पायलटपर्यंत,
चोरांपासून ते पोलीसांपर्यंत,
सर्वत्र त्याचा वापर.

कॉलेजात त्याचा,
अतिरीक्त वापर होतो,
लेक्चर चालू असताना,
नेमका तो आवाज करतो.

ऑफ़िसात सुद्धा त्याची,
एक वेगळिच शान,
भारीतला मोबाईल ज्याच्याकडे,
त्याचा खूप मोठा मान.

मंत्र्यांकडे तर आमच्या,
एक सोडून दोन-दोन,
अन त्यांचे बिल भरायला,
सरकारला घ्यावे लागते लोन.

सेलिब्रिटिज चा नंबर तर,
सर्वसामान्यांना माहित नसतो,
पण त्यातहि कोणी अद्न्यात इसम,
त्यांना नको ते मेसेज करत असतो.

जितका त्याचा फ़ायदा,
तितकाच दुरुपयोग सुद्धा होतो,
कोणासाठि जीवलग तर,
कोणासाठि शत्रू बनतो.

नव-नव्या Ringtones अन,
फोटो काढण्यात चढाओढ,
videos आणि sms मुळे,
खूप जणांचा हिरमोड.

मिस कॉल देण्या-घेण्यावर,
कोणाचे Count नसते,
अन forwarded smsला,
सर्वप्रथम पसंती असते.

पब्लिक पोल साठि,
smsचा आधार असतो,
अन त्याच्याच द्वारे तर आमचा,
Indian idle निवडला जातो.

मोबाईल मार्केटिंग मध्ये,
नेहमीच स्पर्धा असते,
नवीन technology घेऊन रोज,
वेगळेच model येत असते.

तर असा होतो आहे मोबाईलचा,
प्रत्येकाच्या जीवनावर असर,
घट्ट पकड घेतली त्याने,
हर एक च्या मेंदूवर.

मला एकच वाटते,

मोबाईलचा माणसाने,
दुरुपयोग टाळावा,
अन नव-नवीन तंत्रद्यानाचा,
सदुपयोग करावा.....

----निलेश लोटणकर

No comments: