आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, July 17, 2007

स्वप्न म्हणजे काय.?हे कुणालही व्यवस्थित सांगता येइल कय..?
मला तरी ते अतॄप्त मनाच्या इच्छा पुरविणारया कल्पवॄक्षासारखी वाटतात ....!

द्वेष हा धुधारी शस्त्रासरखा असतो ! तो करणार्‍याला आणि ज्याचा केला जातो ,त्या दोघांनाही सारखाच
मारक ठरतो...!

माणसान राजहंससारख असाव। जे पटेल ते घ्याव नाही ते सोडुन दयाव।

काळ म्हणजे तरी काय आहे..? ऐक सारथीच नाही काय..?
मानवरुपी घोड्याच्या पाठीवर आपल्या संकेताचे आसुड मारीत
केव्हा केव्हा किती तो गतीने पिटाळतो हे घोडॆ.....!!!!

कोणी म्हणत आठवणी म्हणजे मोरपिसा सारख्या असतात...तर कोणी म्हणत त्या बकुळीसारखा आपला सुगंध मागे दरवळत ठेवणा-या असतात।पण, मला मात्र ते कधीच पटत नाही.आठवणी या नेहमी हत्त्तीच्या पायासारख्या असतात ! त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भुमीत मागे ठेवुनच जातात.....

माणसाचे प्रेम हे धरतीसारखे असते,अगोदर ऐक दाणा पेरावा लागतो
तेव्हाच धरती अनेक दाण्यानी टिच्चुन भरलेली कणीस देते....
माणुसही तसाच असतो, प्रेमाचा शब्द मिळाला तर
त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार असतो....

No comments: