आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, June 09, 2007

तुझे आभार कसे मानू
हे गरजणारया नभा..
आलीये माझ्या मिठीत ती घाबरूनी
आता तु जरासा रहा तिथेच उभा...

मी बावरलॊ होतो
जेव्हा तु माझ्या मिठीत आलीस..
स्वप्नील दुनियेला माझ्या
तु गुज प्रेमळ अस्तित्वाची दिलीस॥

कुंपणापलिकडे जायचं म्हटलं
तरी काटे तसे फार नव्हते
तिच्या गुलाबी ओठांनी मात्र
बंद केलेले एक दार होते.

जेव्हा मी बोलत नसतो
अन तिही समोर गप्प असते
चार डोळ्यांचे तेव्हा मात्र
सुरू शब्दिक द्वंद्व असते

रूसायचं मी तुझाकडून शिकलोय
त्यात न बोलता झुरवायचं असतं
आसावलेल्या डोळ्यांनी घायाळ करून
मग खोट्या अश्रूंनी चिघळायचं असतं

तिचं गोड हसणं जणू
ग्रीष्मशापाला पर्जन्य-वर आहे
त्याला मृदगंधाने दरवळलेल्या
आसमंताची सर आहे.

तिनं, ‘प्रेम कसं असतं?’ विचारता
मी उपहासाने हसलो
तिच्या डोळ्यांतले भाव सोडून
नस्ती उदाहरणं देत बसलो।


No comments: