........ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा........
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा
आकाशातली चांदणी हातात
आल्याचा भास होतो
किंवा असेही नाही,
कसल्या अनामिक गंधाने
भरून राहिलेला श्वास होतो.
ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हा
आकाशातला चंद्र ढगात
हळूच लपून बसतो
किंवा असेही नाही,
माझा मिश्कील शब्दही
उगिच जपून असतो.
ती अशी डोळे भरून उदास पाहते
तेव्हा आकाशातली नक्षत्र थोडी
हलल्यासारखी वाटतात
किंवा असेही नाही,
मेघांच्या रांगा मनातून
चालल्यासारख्या वाटतात
ती माझी कविता माझ्याचसमोर वाचते तेव्हा
तिच्या डोळ्यांतून माझीच नव्याने
ओळख मला होत असते,
किंवा असेही नाही...
नाते अनामिक दोघांमधले
दोघांनाही कळत-नकळत
वळण सुंदरसे घेत असते...!
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा
No comments:
Post a Comment