आठवण येते कधी मला...
अन गालावर खुद्कन खळी पाडते...
तर कधी हसता-हसता....
डोळी माझ्या पाणी आणते.....
गर्दीत राहुन सुद्धा ती....
एकांताच आभास देते.....
अन एकांतात गेलो तरी मला....
नाही कधी एकटे सोडते....
डोळे बंद केल्यावरचे.....
नवे विश्व दाखवुन देते....
अन उघड्या डोळ्यांनाही .....
ती कधी धुंद करुन टाकते.....
दूर लोटायचा प्रयत्न केला....
तर अधिकच जवळ येवुन बसते....
जवळ तिला बोलवले तर मात्र....
कोपरयात कुठे दडुन बसते.....
हिच आहे माझी खरी मैत्रिण....
नेहमी साथ देणारी.....
आगंतुक असली तरी.....
हवी-हवीशी वाटणारी....
No comments:
Post a Comment