आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, February 07, 2008

नव्या definitions

आजच्या जगातील नव्या बुद्धाला प्राप्त झालेली नवी बोधि : ( new definitions)
1.लोकशाही जिन्दाबाद ( प्रत्येकाची स्वतंत्र हुकुम्शाही असू दया )
२.आपल्याला या योजनेवर पुन्हा विचार करावा लागेल : ( तुझी योजना चांगली आहे ; पण ती तुझी आहे ना !!!)
३.दुस्रया पक्षातुन आपल्या पक्षात आल्यास : ह्रदय परिवर्तन
उलट झाल्यास : गद्दार !
४.घाई करून चालत नाही ; सगल्या बाबिंचा विचार करावा लागतो. ( जाहीरनामा फ़क्त जाहीर करण्या पुरता असतो हे कळत नहीं का ? )
५.घाई करून चालत नाही ; सगल्या बाबिंचा विचार करावा लागतो. ( मी हरीश चन्द्र बनेन ; पण पहिला नाही ! )
६.अन्नाभौची एकसष्टी दणक्यात झालीच पाय्जे ! ( तुम्हाला नसला ; तरी खुर्चीला कंटाला आला आहे.)
७.हे पहा ssssss, तुमचे रक्त तरुण आहे. ( पांढरा केस देवासमान !)
8.भगत सिंगवर प्रेम करायचे ( म्हणजे गान्धिजिंचा द्वेष करायचा अणि चुकुनही एकासारखेही वागायच्या फंदात पडायचे नाही )
उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


गझलकार - सुरेश भट

Wednesday, February 06, 2008

एकटेच शब्द माझे
सोबतीला सूर नाही
दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही

हाच आहे तो किनारा
येथेच होती भेट झाली
अन् संपली जेथे कहाणी
तोही पत्थर दूर नाही

तू जिथे असशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र नांदो
आंधळ्या माझ्या नभाला
चांदण्यांचा नूर नाही

ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांची
पंगतीला या बसावे
मी एव्हढा मजबूर नाही

रात्र त्यांची झिंगलेली
पण आत्मे अस्थिर झाले
शांत आहे झोप माझी
अंतरी काहूर नाही....

पाठ वळता वार करता,
अन् तरी हसता कसे?
वार होता पाय धरने
या दिलाचा दस्तुर नाही...

तू नको पुष्‍पांस वाहू
माझिया थडग्यावरी
थडग्यातला मृद गंध माझा
मी फुलांना आतुर नाही...

त्या तुझ्या नजरेत होता
तारकांचा जो सडा
त्या तारकांनी घात केला
अन् घाव ही अलवार नाही...

मी जरी निष्पराण झालो
आत्मा जागेल हा,
वार्‍यासवे हरवून जाण्या
तो कुणी कापूर नाही...

दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही..

-सौमित्र साळुंखे.